Crime News Saam tv
महाराष्ट्र

पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर परराज्यात नेऊन अत्याचार

व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार मावळमध्ये उघडकीस आला आहे.

दिलीप कांबळे

मावळ : व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करून महिलेला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार मावळमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

आरोपींनी मार्च ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत, दिल्ली, पठाणकोट, अमृतसर व सुरत येथे नेऊन या पिडीतेवर अत्याचार केला आहे. किरण रंभाजी घारे, दिपक रामचंद्र ओसवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिडीत महिलेने मावळ मधील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी किरण घारे हा गुंड प्रवृतीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, आरोपी फिर्यादीच्या परिस्थितीचा फायदा घेईल हे माहीत असतानाही त्याची चांगली व्यक्ती म्हणून आरोपी ओसवाल याने या महिलेशी ओळख करून दिली. त्यातून आरोपी ओसवाल याने या महिलेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

अवैध सावकारी Illegal lending ही समाजात फोफावलेली कीड आहे आणि लोकांच्या मजबुरीचा फायदा घेणारे अनेक सावकार उजळ माथ्याने समाजात फिरतात. एखादीच पीडित महिला अत्याचार सहन होत नसल्याने पोलिसांत धाव घेते. पोलीस प्रशासनाने देखील अश्या लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचं आहे, तेव्हाच कुठे तरी गुन्हे कमी होण्यास मदत होईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT