महाराष्ट्र सुन्न! बदनापूर मध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र सुन्न! बदनापूर मध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

आरोपी विरुद्ध आईच्या तक्रारी वरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : बदनापूर तालुक्यातील देवगावात माणुसकीच्या नात्याला कालिमा फासणारी दुर्दवी घटना घडली आहे. एका नराधमाणे घरासमोर कोंबड्याना दाणे टाकत असलेल्या 12 वर्षीय मुलीला घरात फरफडत घेऊन जात. तिच्यावर विवस्त्र होऊन लेंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून बदनापूर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अत्याचारानंतर आरोपी फरार असून, या प्रकरणी पोलिस आरोपीच्या शोध घेत आहे. मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ जालना जिल्ह्यत बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

नागरिकांकडून या धक्कादायक घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवशी बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात 9, 13 आणि 21 वर्षीय मुलींवर बलात्कार झाला आहे. एकाच दिवशी 3 अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांनी शहरात मुली, महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

Sambhajinagar : धक्कादायक! समाज कल्याणच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

SCROLL FOR NEXT