Raosaheb Danve, Eknath Shinde News, Shiv Sena News, latest Politics News Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेनेचे 12 खासदार संपर्कात शिंदे गटात येण्याच्या तयारीत; रावसाहेब दानवेंचा दावा

खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच, हे आधीच्या प्रकरणावरून न्यायालयात सिद्ध होईल, मुलायम सिंग यांच्या पक्षाप्रमाणे शिवसेनेचं चिन्हही जाईल - रावसाहेब दानवे

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली आहे. हे बारा खासदार शिंदे गटाच्या मूळ शिवसेनेत येणार असल्याचा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला आहे. ते जालन्यात बोलत होते. पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, मुलायम सिंग यांच्या पक्षाप्रमाणेच शिवसेनेकडे निवडणूक चिन्ह देखील राहणार नसल्याचं सांगत न्यायालयाने आधी काही दिलेल्या निर्णयाचा दाखला दिल्यास खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे हे सिद्ध होईल असंही दानवे म्हणाले. (Eknath Shinde News)

हे देखील पाहा -

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था भाजप मित्र पक्षांच्या मदतीने स्वबळावर निवडणूक लढवेल शिंदे गटाशी देखील चर्चा केली जाईल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू असंही सांगायला दानवे विसरले नाहीत.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं असून या निवडणुकीत भाजप ओबीसींना पूर्ण न्याय देईल असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. (Latest Politics News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT