Raosaheb Danve Saam TV
महाराष्ट्र

Raosaheb Danve VIDEO: 'ऐ हसणारा, चल उठ...', भाषणादरम्यान खीखी हसणाऱ्याला रावसाहेब दानवेंनी झाप झाप झापलं, पाहा व्हिडीओ

Raosaheb Danve Angry: जालन्यात एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्यावर चांगलेच भडकले.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या मिश्किल आणि सडेतोड स्वभावासाठी सर्वश्रूत आहेत. समाजात वावरताना, भाषणांमध्ये दानवे अत्यंत स्पष्टपणे बोलतात. मात्र दानवेच्या कार्यकर्त्यांना आज त्यांचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. जालन्यात एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्यावर चांगलेच भडकले.

जालन्यात प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कर्ज वितरण कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे लाभार्थ्यांना योजनेचं महत्व समजावून सांगत होते. यावेळी रावसाहेब दानवे मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत होते. मात्र एक कार्यकर्ता आपल्यासोबत असलेल्या एकासोबत चर्चा करताना हसत होता. (Political News)

रावसाहेब दानवे यांच्या ही बाब निदर्शनास येतात त्यांनी त्याला हसण्याबाबत जाब विचारला. दानवेंनी संतापून त्या कार्यकर्त्याला तू लाभार्थी आहे का? असा प्रश्न विचारून त्याला उठून जायला सांगितलं. दानवे विविध योजनांची माहिती समजावून सांगत असताना त्यांना इतर लोक डिस्टर्ब होत असल्याचे लक्षात आल्याने दानवे भर कार्यक्रमात भडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

SCROLL FOR NEXT