Ranjeet Kasle : Saam tv
महाराष्ट्र

Ranjeet Kasle : रणजित कासले पोलिसांना शरण येणार? चॅलेंज देणारा निलंबित पोलीस अधिकार नरमला? पाहा व्हिडिओ

Ranjeet Kasle News : वाल्मिक कराडच्या हत्येची ऑफर देण्यात आल्याचा दावा करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा व्हिडिओ समोर आलाय. पोलीसांना चॅलेज देणारे कासलेने आता यु-टर्न घेतलाय. पण यामागे नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी आपल्याला ऑफर देण्यात आल्याचा दावा कासलेनं केला होता.. कासलेच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राऊतांनी कासलेनं मुंडेंबाबत केलेल्या दाव्याच्या चौकशीची मागणी केली. मात्र याच मस्तवाल कासलेनं प्रशासनालाच खुलं आव्हानं दिलं होतं...

कासलेनं कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिल्याचा दावा केला होता..एवढचं नव्हे तर पोलीस डायरीत एन्काऊंटरची नोंद केल्याचंही कासलेनं सांगितलं. कासलेनं थेट मुंडेंचं नाव घेतलं असलं तरी मुंडेंनी याबाबत मौन बाळगलंय.. एकीकडे पोलीस यंत्रणेला आव्हान देणारा कासले आता लवकरच शरण येण्याचा दावा करतोय.

मात्र कासलेंनी केलेल्या दाव्यामागे कोणाचा दबाव होता? कासलेचा आका कोण आणि कासलेनं केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का ? कासलेनं नोंद केलेल्या पोलिस डायरीचं काय झालं? आणि ज्या धनंजय मुंडेंचं नाव कासलेनं घेतलं त्यांच्यावर कारवाई होणार का? याची उत्तर कासले पोलिसांना शरण आल्यावर तरी मिळणार का की बीड फाईल्सच्या गठ्ठ्यात कासले प्रकरणही दबलं जाणार हेच पाहायचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT