Sambhaji Raje News, Uddhav Thackeray News, Sambhajiraje Chhatrapati Latest News, Rajya Election 2022 News Saam TV
महाराष्ट्र

आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार; संभाजीराजे समर्थकांचा इशारा

आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. असा मजकूर या पोस्टरमध्ये छापण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Election 2022) सहाव्या जागेवरून राजकारण तापलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना भाजप (BJP) आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. संभाजीराजेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्टर देखील व्हायरल केलं आहे.(Sambhajiraje Chhatrapati Latest News)

आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. असा मजकूर या पोस्टरमध्ये छापण्यात आला आहे. यामुळे आता संभाजीराजे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती.

मात्र ऐन वेळेवर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारत संजय पवार यांना रिंगणात उतरवलं. त्यामुळे मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, संभाजीराजे समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टरमध्ये "आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४ असा मजकूर छापण्यात आला आहे". या माध्यमातून शिवसेना आणि महाविकासआघाडीला एकप्रकारे इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीला संजय राऊत हे सातत्याने विरोध करत आहेत. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल. राऊत यांना सन 2024 च्या निवडणुकीत मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

दुसरीकडे राज्यसभेची उमेदवारी संजय पवार यांना मिळाली असल्याची चर्चा असली तरी, शिवसेनेने मात्र नावाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. बुधवारी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT