Chandrapur News, school, students, road issue,  saam tv
महाराष्ट्र

Rajura Gowari Road Issue : शाळेत आनंदाने जाणा-या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागताे प्रवास, लाेकप्रतिनिधींसह प्रशासनला जाग येईल का? (पाहा व्हिडिओ)

खराब रस्त्यामुळे बस सेवा देखील बंद झाली आहे.

संजय तुमराम

Chandrapur News : गेल्या दोन वर्षांपासून राजुरा -गोवरी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम पावसाळ्यात सुरू आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. (Maharashtra News)

राजुरा -गोवरी मार्गावरील नाल्यावरील कच्चा रस्ता पावसामुळे (rain) वाहून गेला आहे. त्यामुळे राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक देखील ठप्प हाेत आहे. वाहून गेलेल्या रस्त्यामुळे शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे बेहाल हाेत आहेत.

या भागातील रुग्णांना उपचारासाठी राजुरा येथे वेळेत पोचता येत नाही. येथील बस सेवा देखील बंद झालेली आहे. या मार्गावर वाहतूक व वर्दळ असताना पूलाचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते. (chandrapur)

गोवरी येथे गोयेगाव व माथरा येथील विद्यार्थी (students) हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी येतात. तसेच राजुरा येथे महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी गोवरी, पवनी ,कडोली येथून ये- जा करतात. मात्र शैक्षणिक हंगामातच रस्त्याची दुरावस्था असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पोकळ आश्वासने देऊन प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल केल्याने संताप व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT