raju shetti joins atamklesh andolan of prashant dikkar in buldhana saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti : सरकारच्या कृत्यामुळे 6 महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत अडीच टक्क्यांनी वाढ : राजू शेट्टी (पाहा व्हिडिओ)

Raju Shetti march : राजू शेट्टींनी पाच किलाेमीटर अंतर पायी चालत सरकारचा निषेध केला.

संजय जाधव

Buldhana News :

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. सरकारला जागे करण्यासाठी शेतक-यांना आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा काढावी लागते. या यात्रेत असंख्य शेतकरी सहभागी हाेताहेत याचाच अर्थ सरकारची धाेरणं चुकली आहेत. सरकारच्या कृत्यामुळे गेल्या सहा महिन्यांत शेतक-यांच्या आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana leader raju shetti) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

शेतकरी शेतमाजूर व सामान्य जनतेच्या हितासाठी गेल्या 17 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर (prashant dikkar) यांच्या नेतृत्वात शेगाव ते जळगाव जामोद आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा सुरु आहे.

आज या यात्रेचा समारोप जळगाव जामोद येथे स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित झाला. या पायी यात्रेत शेट्टी हे सहभागी झाले हाेते. त्यांनी पाच किलाे मीटर अंतर चालत सरकारचा निषेध व्यक्त केला.

शेट्टी म्हणाले सरकारने पीक विमा मिळवून देण्यात कसूर केली. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीला अत्यंत अल्प मदत देण्यात आली. साेयाबीन, कापूस, ऊस उत्पादक शेतक-यांना मदत करण्यात सरकार कमी पडले आहे. सरकारचे शेतक-यांविषयीचे धाेरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या सहा महिन्यांत शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे शेट्टींनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT