Kolhapur Fire Twitter
महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या आंदोलनाला हिंसक वळण, शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

या आगीची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सुरु असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल इथल्या महावितरणचे कार्यालयाला आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये काही कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

हे देखील पहा -

छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आणून आग आटोक्यात आणण्यात आली. जोपर्यंत शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्‍या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. यासाठी कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ या मागणीसाठी त्यांनी आंदोलन करण्यात येत आहे.

तर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर शांततेने आव्हान करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांच्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. अशं ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : आयपीएलच्या १० संघांचे कॅप्टन ठरले, तुमच्या फेव्हरिट टीमचा कर्णधार कोण? जाणून घ्या

भाजप खासदारासाठी अडीच महिने बंद असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी केले खुले

Chaitra Navratri Recipes: चैत्र नवरात्रीला गॅस न वापरता करा उपवासाचे हे सोपे पदार्थ

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

SCROLL FOR NEXT