Raju Shetti Latest Marathi News, Latest Political News
Raju Shetti Latest Marathi News, Latest Political News saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti: धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजली जात आहे : राजू शेट्टी

संतोष जोशी

नांदेड : शेतकऱ्यांचे (farmers) प्रश्न सुटत असतील तर आम्ही कुठेही नमाज (namaz) पडू, हनुमान चालीसा (hanuman chalisa) म्हणू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजु शेट्टी (raju shetti) यांनी नांदेड (nanded) येथे नमूद केले. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न साेडविण्यात सपशेल फेल गेल्याचे शेट्टींनी नमूद केले. (Raju Shetti Latest Marathi News)

राजू शेट्टी हे नांदेड दाै-यावर आले आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी यांनी राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला पडू लागले आहेत. नकाे त्या गोष्टींवरुन वाद निर्माण केला जात आहे. त्यातून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे असे नमूद केले.

राजु शेट्टी म्हणाले एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (pandharpur) जमलेल्या लाखों भाविक पांडुरंगाचे दर्शन झालं की जेवणासाठी चंद्रभागेच्या वाळूवर बसतात. तेथील माेकाट कुत्र्यांना त्या भाक-यांवर फडशा पाडायचा असताे. मात्र तेथे वारकरी असल्याने कुत्र्यांना भाक-या मिळविण्यासाठी धडपड करावी लागती.

ही कुत्री एकमेकांत भांडतात. भुकुंन भुकुंन कालवा करतात. भाेळ्या भाबड्या वारक-यांना हे पहावत नाही. ते त्या कुत्र्याचं भांडण सोडवायला उठतात. त्याचवेळेस कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झालेली आहे असे शेट्टी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT