- राजेश टोपे - Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६६- राजेश टोपेंची माहिती

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यांतील डेल्टा प्लस रुग्णांचा आकडा 66 वर गेला असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात डेल्टा प्लस Delta Plus रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यांतील Maharashtra डेल्टा प्लस रुग्णांचा आकडा 66 वर गेला असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे. Rajesh Tope Informs about delta plus variant patients

जळगावमध्ये 13, रत्नागिरीत 12, मुंबईत 11, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 6, पालघर आणि रायगडमध्ये प्रत्येकी 3, नांदेड आणि गोंदियात प्रत्येकी 2, चंद्रपूर,अकोला,सांगली, औरंगाबाद, बीड येथे प्रत्येकी 1 असे एकूण 66 रुग्ण असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस केलं जातं असल्याचं देखील टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे Corona दोन्हीही लसींचे डोस घेऊन 66 पैकी 10 जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचं टोपे यांनी म्हटलंय.तर याच 66 पैकी 8 जणांनी कोरोना लसीकरणाचा Corona Vaccine पहिला डोस घेऊन त्यांना देखील डेल्टा प्लसची लागण झाल्याचं ते म्हणाले.Rajesh Tope Informs about delta plus variant patients

18 पैकी 16 लोकांनी कोबिशिल्ड लस घेतली असून दोघांनी कोव्हकसिन लस घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांचा मृत्यू डेल्टा प्लस मुळेच झाला असं म्हणता येणार नाही असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT