Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

'एसटी संप जास्त ताणू नका',राजेश टोपे यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मंत्रिमंडळ बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार; टोपे यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासन

लक्ष्मण सोळुंके

जालना- एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी चर्चा करणार असून आता एसटी चालवण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Worker) संप जास्त ताणू नये असं आवाहन राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे. जालना जिल्ह्यातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर टोपे यांनी हे आवाहन केलं.

हे देखील पहा -

याआधी देखील परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार असून एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त न ताणवता चर्चेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटल आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी देखील या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल असं आश्वासन देखील टोपे यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

Farmer Scheme : फडणवीस सरकारकडून नव्या योजनेची घोषणा, 'या' शेतकऱ्यांना मिळणार २ लाख रुपये

SCROLL FOR NEXT