Crime News, washim Saam TV
महाराष्ट्र

Rajasthan Crime News: हे कसलं प्रेम! धावत्या दुचाकीवरुन शिक्षिकेवर तलवारीने सपासप वार; महिलेवर उपचार सुरू

Attack On Teacher: तिच्यासोबत असलेल्या भावावर देखील तलवारीने वार करण्यात आलेत.

Ruchika Jadhav

Rajasthan News:

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक शिक्षिका आपल्या भावासोबत दुचाकीवरुन घरी जात असताना तिच्यावर तलवारीने वार करण्यात आलेत. सदर व्यक्ती महिलेचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे. नराधमाने शिक्षिकेला खाली पाडून तिच्यावर वार केले. तिच्यासोबत असलेल्या भावावर देखील तलवारीने वार करण्यात आलेत. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रियकर नराधम आणि त्याचे काही मित्र यांनी एकत्र येत शिक्षिकेला जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. आधी त्यांनी तिच्या मानेवर वार केला. ती खाली पडल्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी आणखीन ३ वार तिच्यावर केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिला शिक्षिकेला नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. शाळेत विद्यार्थ्यांना शिवकण्यासाठी महिला शिक्षिका नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडली. भावासोबत जाताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. या घटनेत महिलेच्या भावावर देखील वार झाल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला एक घटस्फोटीत आहे. हे प्रकरण एकतर्फी प्रेमातील असल्याचं समजलं आहे. आरोपीने याआधी देखील महिलेवर हल्ला करत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Maharashtra News Live Update: डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT