राजर्षी शाहूंची जयंती यावर्षीपासून राधानगरी धरणावर Saam Tv
महाराष्ट्र

राजर्षी शाहूंची जयंती यावर्षीपासून राधानगरी धरणावर

यावर्षी पासून राधानगरी धरणावर आगळ्या वेगळ्या पध्दतीने शाहू जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती, शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनी दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजी थोरात

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी निर्मिलेले राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्याच्या सुबत्तेचे प्रतिक आहे. या धरणामुळेच जिल्ह्यातील शेती हिरवीगार झाली असून या राधानगरी धरणाची निर्मिती राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीने झाली तर त्यासाठी पिराजीराजे घाटगे यांनी देखील कष्ट घेतले. राधानगरी धरण हे शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचे प्रतीक मानले जाते. Rajarshi Shahu jayanti on Radhanagari dam from this year

त्यामुळे यावर्षी पासून राधानगरी धरणावर आगळ्या पध्दतीने शाहू जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती, शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनी दिली. 26 जून रोजी राहर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. या दिवशी राधानगरी धरणावर ज्यांच्या जमिनी धरणासाठी गेल्या आहेत असे बारा बुलुतेदार सपत्नीक याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

कागलच्या राजघराण्याचे वंशज समरजीत घाटगे त्यांच्या पत्नी नवोदा घाटगे आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते शाहू महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक घालणार आहेत. यावेळी धरणाच्या पाण्याचे पूजन देखील केले जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT