Rajan Salvi, Narayan Rane, Barsu Refinery saam tv
महाराष्ट्र

Rajan Salvi On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या दाै-यावरुन काेकणात घमासान; राजन साळवींचा नारायण राणेंना इशारा

येत्या काही दिवसांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू दाै-यावर येणार आहेत.

अमोल कलये

Rajan Salvi News : नाराायण राणेंना शिवसेेनेमुळे मान सन्मान मिळाला आहे. शिवसेनेनी त्यांना राजकारणाचे बाळकडू दिलं. त्यामुळेच आजही नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बोलण्याची धम्मक आली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना थांबवण्याची भाषा काेणी करू नये असा इशारा ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नारायण राणेंसह त्यांच्या गटाला दिला आहे. (Maharashtra News)

राजापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्ट्रीने रिफायनरी हा प्रकल्प व्हावा अशी माझी भुमिका आहे. या प्रकल्पामुळे रोजगार मिळेल अशी भुमिका होती. बारसूमध्ये जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे आम्ही नाराज झालाे आहेत. माझी भुमिका समर्थनाची होती त्यामुळे तिथे गेलो नव्हतो असेही साळवींनी नमूद केले.

साळवी म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेेंचा आदेश तो वंदनीय, पक्ष प्रमुखांचा आदेश पालन करणे माझे कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी बारसू येथे जाणार. बारसूच्या आजूबाजूच्या पाच गावात विरोध आहे.

शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश पाळणे कर्तव्य असून बरळण्याचे काम अनेकदा नारायण राणेंनी केले आहे परंतु पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा काेणी करू नये आधी आमच्याशी संघर्ष करा नंतर बघू असा (टायगर अभी जिंदा) असा जणू नाराय़ण राणेंना सुचक इशारा राजन साळवींनी दिला.

दरम्यान शरद पवार यांनी पदावरून पाय उतार होवू नये अशी आमची आणि कार्यकत्यांची भावना आहे. शरद पवार हे दिग्गज नेतृत्व असल्याचे राजन साळवींनी आजच्या शरद पवार यांच्या निर्णयावर मत व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT