राजा नावाच्या कोंबड्याची बँन्डबाजा लावून अंतयात्रा  संतोष जोशी
महाराष्ट्र

राजा नावाच्या कोंबड्याची बँन्डबाजा लावून अंतयात्रा

आजवर आपण जिवापाड प्रेम करणाऱ्या प्राणी मित्रांकडून कुत्र, बैल, माकडं अशा अनेक प्राण्यांचे अंत्ययात्रा, दफनविधी बघितले.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : आजवर आपण जिवापाड प्रेम Love करणाऱ्या प्राणी Animals मित्रांकडून कुत्र, बैल, माकडं अशा अनेक प्राण्यांचे अंत्ययात्रा, दफनविधी बघितले. मात्र, नांदेडच्या Nanded मुखेड Mukhed तालुक्यामधील सावरमाळ Savarmal मध्ये एका राजा नावाच्या कोंबड्याचे मृत्यू नंतर मालक आणि गावकऱ्यांनी मिळून अंत्ययात्रा काढून विधीवत अंत्यविधी केला आहे.

हे देखील पहा-

१० वर्ष मालकाला साथ देणाऱ्या राजा नावाच्या कोंबड्याला ४ दिवसांपूर्वी मांजराने Cat चावा घेतल्याने, कोंबडा जखमी झाला होता. या कोंबड्यावर बरेच उपचार करुन, देखील हा कोंबडा वाचला नाही. गावांत सर्वत्र स्वच्छंद हुंदडत असलेला हा कोंबडा गावकऱ्यांना अत्यंत प्रिय होता. लोकांनी दिलेले भजे, मुरमुरे खात असत. सर्वांचा लाडका कोंबड्यावर मालक शंकर कोकलेचा लाडका होता. या राजाच्या अचानक जाण्याने मालक आणि गावकऱ्यांना दुखः झाले आहे.

यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत राजा या कोंबड्याची बँड लावून अंत्ययात्रा काढली आहे. शंकर कोकले यांच्या शेतात खड्डा तयार करुन, विधीवत अंत्यसंस्कार केले आहेत. राजाच्या अंत्यविधीस मोठ्यासंख्येने गावकरी उपस्थित होते. सध्या कोरोनामुळे रक्ताच्या नात्यातल्या लोकांच्या अंत्यविधीस जाताना दिसत नाहीत. मात्र, १० वर्षांत गावकऱ्यांची मने जिंकणाऱ्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी बघायला मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT