MNS news  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार?परदेशवारीनंतर आता युतीची बारी? राऊतांनी दिले युतीचे संकेत

Thackeray brothers: परदेश दौऱ्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा रंगलीय.. त्यावर संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील कोणते समीकरण बदलणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

2006 मध्ये स्वतंत्र वाट निवडलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय.. त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद....आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटोपून आलेत.. त्यामुळे युतीची चर्चा कधी होणार? यावर संजय राऊतांनी ठाकरे गटाची भूमिका जाहीर केलीय...

2006 मध्ये स्वतंत्र मार्ग निवडलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरलाय. राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना दिलेल्या साद आणि उद्धव यांच्या प्रतिसादामुळे ही चर्चा पेटली. परदेश दौऱ्यांनंतर आता युतीच्या बोलणीबाबत उत्सुकता आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केलीय.

2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली. यानंतर अनेकदा एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, पण त्या फलद्रूप झाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली, पण विधानसभेत त्यांना मोठा फटका बसला. मनसेलाही एकही जागा मिळाली नाही. आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा नारा दिलाय. यामागची कारणं पाहू:

विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव.

एकत्र येण्याने दोन्ही पक्षांना फायदा.

शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग.

महापालिका निवडणुकीत युतीचा फायदा.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य.

उद्धव यांचं संघटनकौशल्य आणि राज यांचं प्रभावी भाषण पक्षवाढीसाठी उपयुक्त

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, 6 महिन्यांत महापालिका निवडणुका होणार आहेत. सर्व पक्ष तयारीला लागलेत. परदेश दौऱ्यानंतर युतीच्या चर्चेची अपेक्षा होती, पण ठाकरे बंधूंमध्ये अद्याप बोलणी झाल्याचं समोर आलं नाही. हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर सरकारला घेरणाऱ्या ठाकरे बंधूंची युती कधी ठरेल? ते एकत्र येणार की स्वतंत्रपणे लढणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT