Raj Thackeray’s Unity Call: saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हिंदी सक्तीविरोधातून एकीची नांदी? राज ठाकरेंनी टायमिंग साधलं? ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकी?

Thackeray Brothers Reunion : राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं...आता तेच टायमिंग राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव देऊन साधलंय... मात्र आताच राज ठाकरेंनी हा प्रस्ताव का दिला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय.. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत....लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आणि अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साद घातलीय.. मात्र राज ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगसाठी कारण ठरलाय तो राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय...राज ठाकरेंचं राजकारण हे भाषिक मुद्द्यावर अवलंबून आहे..मात्र सरकारने त्याच मुद्द्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याने राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे.... मात्र या टायमिंगचा नेमका अर्थ काय? पाहूयात...

एक देश एक भाषेचा नारा देत केंद्राकडून राज्याच्या अस्मितेला आव्हान

हिंदी सक्ती केल्याने राज ठाकरेंच्या भाषिक राजकारणाला धक्का

प्रादेशिक पक्षांना एकत्र करत केंद्राविरोधात संघर्ष करण्याची रणनीती

मनसे शहरी भागांपुरता मर्यादित, त्यामुळे पक्षवाढीसाठी युतीचा फायदा होण्याची शक्यता

विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्याने मनसे आणि ठाकरे गट समदुःखी

तर राज ठाकरेंना आपला होत असलेला वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय..

राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं... तेच आता राज ठाकरेंनी साधलंय.. मात्र उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही युती होणार का? आणि राज ठाकरेंनी साधलेलं टायमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार? यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT