Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Raj Thackeray News : राज ठाकरेंचं 'मिशन लोकसभा'; १ फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर

Raj Thackeray on Nashik Tour : राज यांच्या उपस्थितीत नेमकं कोण मनसेत प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्या १ फेब्रुवारीला राज ठाकरे नाशकात दाखल होणार आहेत.

प्रविण वाकचौरे

Raj Thackeray on Nashik Tour :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली आहे. सर्व पक्षांचे कार्यक्रम, सभा, शिबीरे सुरु झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.

राज ठाकरे आपल्या मिशन लोकसभानिमित्त उद्यापासून नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज घेणार नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर घेणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे अनेक स्थानिक पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अन्य पक्षातील काही दमदार नेत्यांचेही प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. (latest News)

राज यांच्या उपस्थितीत नेमकं कोण मनसेत प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्या १ फेब्रुवारीला राज ठाकरे नाशकात दाखल होणार आहेत. उद्याच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर आणि पक्षप्रवेश सोहळा आहे.

त्यानंतर २ फेब्रुवारीला राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नेमका २ दिवसांचा असणार की ४ दिवसांचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT