Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 2008 साली छटपूजे संदर्भात राज ठाकरे यांनी चिथावनिखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत राज ठाकरे यांच्याविरुद्धचा समन्स दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवला आहे. (Political News)
दिल्ली हायकोर्टाचं निरीक्षण
सिधी बात नो बकवास अशा स्वाभावाच्या राज ठाकरे यांना नेहमीच त्यांच्या भारदास्त वक्तव्यांनी ओळखलं जातं. २००८ साली झालेल्या छटपूजेवर त्यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यावर दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे की, " राज ठाकरे यांच्याविरुद्धचे समन्स दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवले आहेत. यावर आपल्या निरीक्षणात हायकोर्टाने म्हटलं की, एखाद्या व्यक्तीच्या अशा वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत. धर्म आणि श्रद्धा ही माणसाइतकी नाजूक नसते. राज ठाकरे यांच्या भाषणाने धार्मिक भावनांचा भंग होऊ शकत . नाही,असं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
साल २००८ रोजी छठ पूजेविषयी बोलताना राज ठाकरे यांनी या पुजेला नाटक आणि संख्यात्मक शक्तिचे प्रदर्शन असं संबोधलं होतं. ही पूजा बिहार आणि उत्तर प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
याचिकाकर्त्यांने यात म्हटले होते की, राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने जबरन हावडा-बॉम्बे एक्सप्रेसमध्ये काही व्यक्तींनी प्रवेश करत रेल रोखो केला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाकडून (Delhi High Court) राज ठाकरेंवरील समन्स रद्द करण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.