Raj Thackeray in fierce form during a previous rally; Mira-Bhayandar braces for political storm Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: राज ठाकरेंची तोफ मिरा- भाईंदरमध्ये धडाडणार,'मिरा- भाईंदरमध्ये वाघ येतोय'

Marathi Pride vs Political Power: परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मस्तवालपणाला याचं मिरा- भाईंदरमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. त्यातच आता मिरा- भाईंदरमध्ये 18 जुलैला राजगर्जना पाहयाला मिळणार आहे.

Omkar Sonawane

मुजोर अमराठी व्यापाऱ्य़ाविरोधात मिरा- भाईंदरमध्ये निघालेला हा विराट मोर्चा सत्ताधाऱ्यांसह मराठीदेष्ट्यांची धडकी भरवणारा ठरला होता. याचं मोर्चातं मराठी माणसाच्या एकजूटीनं परप्रांतीयांच्या मुजोरपणाला चपराक दिली होती.आता त्याच ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे... वाघ येतोय... असं म्हणत राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सभेची जोरदार तयारी सुरु केलीय...

मिरा- भाईंदर महापालिकेचं 'राजकारण'

भाजप- 66 नगरसेवक

शिवसेना (एकत्रित)- 22 नगरसेवक

काँग्रेस- 10 नगरसेवक

मनसे- 0

राष्ट्रवादी - 0

मिरा- भाईंदर महापालिकेत 2017 ला मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. त्यात येत्या निवडणूकीत मराठी मोर्चानंतर मनसेला भोपळा फोडता येईल का? यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी वॉर्डनिहाय बांधणी सुरु केलीय. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र येण्याचा निर्णय़ घेतला तर मराठी मतं ठाकरे बंधूंच्या पक्षाकडे वळतील. त्यामुळे भाजपची महापालिका निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठी विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंची ही पहिलीच सभा असल्यानं या सभेतून पालिका निवडणुकीसंदर्भातले कोणते आदेश कार्यकर्त्यांना देतात,याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT