राज ठाकरे  Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

uddhav thackeray raj thackeray : उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत.

Namdeo Kumbhar

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याबाबत समिंश्र प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेत्यांकडूनही याबाबतच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरेंच्या सूचना -

संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका. परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना या विषयावर बोलणं टाळा अशा सूचना दिल्या आहेत. मनसेच्या काही नेत्यांनी युतीसंदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्यामुळे राज ठाकरेंनी या सूचना दिल्याचे बोलले जातेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, अशी थेट सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत कुठेही बोलू नका. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. ते महाराष्ट्रात परतल्यानंतर त्या विषयावर सविस्तर बोलतील. तोपर्यंत कुणीही ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलू नये, अशा सूचना मनसेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील विषयावर बोलणं टाळा असा थेट आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज ठाकरेंनी एका मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंना युतीची साद घातली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी वाद, भांडणं सोडून एकत्र यायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटलं होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी भांडणं सोडली, महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही शिंदे आणि भाजप यांच्यासोबत ताटाला ताट लावून बसणं टाळा.. महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समि‍करणाची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

SCROLL FOR NEXT