Raj Thackeray during a past rally in Mumbai all eyes on his October 19 address at Nesco Goregaon Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: 19 ऑक्टोबरला 'राज'कीय बॉम्ब फोडणार? राज ठाकरे युतीची घोषणा करणार?

Big Reveal On October 19: ऐन दिवाळीतच राज ठाकरे नवा राजकीय बॉम्ब फोडण्याची शक्यता आहे... मात्र राज ठाकरे मेळाव्यात कोणता राजकीय बॉम्ब फोडणार?19 ऑक्टोबरच्या मेळाव्यात युतीची घोषणा होणार की एकला चलोचा नारा देणार?

Bharat Mohalkar

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिकता बाकी आहे... त्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे 19 ऑक्टोबरला राजकीय बॉम्ब फोडण्याची शक्यता आहे... कारण राज ठाकरेंनी तातडीने बुथप्रमुख, गटाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरला आयोजित केलाय....

खरंतर मराठीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकीचा नारा दिलाय.. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठीही वाढल्या .तीन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या तब्बल 8 वेळा भेटी झाल्या. तर मतदारयाद्यातील घोळासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.... एवढंच नव्हे तर मतदारयाद्या दुरुस्त झाल्या नाही तर निवडणुका नको, अशी एका सुरात मागणी दोन्ही बंधूंनी केली.. तर पुढची भूमिका 2-3 दिवसांत जाहीर करणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय...

त्यामुळे 19 ऑक्टोबरच्या मेळाव्यात राज ठाकरे मतदारयाद्यातील घोळावरुन पदाधिकाऱ्यांना सूचना देत निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार की महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

SCROLL FOR NEXT