Raj Thackeray criticizes BJP and Amit Shah over the Ayodhya Ram Temple donation theft controversy. saam tv
महाराष्ट्र

हिंदूच लुटतायत हिंदूंची मंदिरं, राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंचा संताप, 'शाह'-काटशहावरून भाजपवर निशाणा

Raj Thackeray On Ram Temple Theft Bjp Amit Shah Attack: अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणानं देशभरात एकच खळबळ उडवलीये. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ठाकरेंनी नेमका कोणावर निशाणा साधलाय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....

Saam Tv

देशातील कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतल्या पैशांच्या चोरीमुळे साऱ्या देशात संतापाची लाट पसरलीय. इतकंच नव्हे तर अनेक राजकीय पक्षांकडून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवण्यात येतेय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून भाजपचा जोरदार समाचार घेतलाय. प्रभु रामचंद्राचे नाव घेत सत्तेवर आलेल्यांना राम मंदिरातील चोरी प्रकरणाचं काहीच वाटत नाही का?, असा परखड सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. विशेष म्हणजे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात...

राम मंदिरातील चोरीवरून

ठाकरेंचा शाहांवर निशाणा

भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे. आधी परकीयांनी हजारो वर्ष इथली मंदिरं लुटली आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटतायंत? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही? उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षाना आपोआपच खिळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भाजपात पुढे कोण यावरून जो सुप्त संघर्ष सुरू आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात. अगदी खासदार, आमदार फोडाफोडी पासून ते मंदिरांपर्यंत ! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधीपक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचं कारणच नाही. लोकांच्या श्रद्धेला जो तडा गेलाय त्याचा हिशोब हिंदू जनतेला मिळाला पाहिजे.

तर दुसरीकडे, ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनीही भाजपवर टीकेची झोड उठवलीये..

एकीकडे, अयोध्येतील राम मंदिर अपहार प्रकरणात रामभक्तांची देणगी लूटणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी होतेय. तर दुसरीकडे, राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाहांच्या संभाव्य राजकीय खेळीवर भाष्य करत देशाच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यामुळे हे प्रकरण अपहारापुरते मर्यादित नसून यामागे भाजपमधील अंतर्गत शह-काटशहाचं राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर अपहार प्रकरणाच्या आडून शाहांकडून आपल्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? याचीही चर्चा यानिमित्तानं राजकीय विश्वात रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT