शिल्पा...तू सुद्धा???  SaamTv
महाराष्ट्र

शिल्पा...तू सुद्धा???

पोलिसांनी राज कुंद्राच्या घरी छापेमारी केल्यानंतर आता अभिनेञी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. शिल्पा शेट्टी ही कुंद्रासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार..

सुरज सावंत

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांकडून आधीच अटक करण्यात आली आहे. २७ जुलै पर्यंत कुंद्राला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राच्या घरी छापेमारी केल्यानंतर आता अभिनेञी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. शिल्पा शेट्टी ही कुंद्रासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचे अनेक पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मुंबई क्राईम ब्रांचकडून शिल्पा शेट्टीचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी देखील राज कुंद्राच्या या पोर्नोग्राफी बनवणाऱ्या विविध कंपन्यांवर डायरेक्टर असल्याचे पुरावे पोलिसांना मिळून आले आहेत.

कुंद्रा प्रकरणात शेट्टी कनेक्शनही पोलिसांना सापडल्यामुळे शिल्पाच्या बँक अकाऊंटची आणि व्यवहाराची तपासणी करण्यात येणार आहे. या बँक अकाऊंटच्या माध्यमातून राज कुंद्राने ऑनलाईन सट्टेबाजी केल्याची माहिती समोर येत आहे. या पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पाय देखील खोलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT