IMD Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : विदर्भातील ११ जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, मराठवाड्यात कसं असेल हवामान? वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

मान्सूनची चाल अजूनही थबकली असून राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आज बुधवारपासून पुढील ४ दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पाऊस येत्या २-३ दिवसात म्हणजे १० ऑक्टोबरदरम्यान कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता जाणवते आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यात तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, तसेच चंदीगड दिल्ली, राजस्थानच्या सर्व भागातून माघार घेतली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातूनही मान्सून माघारी परतला आहे.

मात्र, असं असलं तरी मान्सून पूर्णत: माघारी परतला नसून मौसमी वाऱ्यांची चाल थबकली आहे. गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. हीच बाब लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच गुरूवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth cancer: तोंडाचा कॅन्सर झालाय हे कसं ओळखाल? 'ही' 6 लक्षणं दिसली तर सावध व्हा

Diabetes : डायबिटीजच्या आधी दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष दिलं तर टाळता येऊ शकतो मोठा धोका

Maharashtra News Live Update: ‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई

अलिशान हॉटेलमध्ये थरार! ५ अन् १० वर्षांच्या मुलींचा गळा आवळला; पोलिसांच्या हाती लागली 'ती' चिठ्ठी

Blood type heart attack risk: कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो अधिक

SCROLL FOR NEXT