बीडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी; शहरातील मुख्य रस्ते जलमय Saam Tv
महाराष्ट्र

Rain Update : बीडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी; मुख्य रस्ते जलमय

अनेक वाहनं पडली गुडघाभर पाण्यात बंद...नागरिकांचा दे धक्का...

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने Rain हजेरी लावली आहे. बीडसह Beed जिल्ह्यातील गेवराई, केज, धारूर, माजलगाव, पाटोदा, आष्टी यासह सर्वच तालुक्यात पावसाची पुन्हा एकदा तुफान बरसात झाली आहे. तर रात्री साडेसात वाजता सुरू झालेल्या पावसाने साडेअकरा पर्यंत बीड शहरातील, नगर रोड, जालना रोड, बार्शी रोड हे जलमय झाले होते.

हे देखील पहा -

शहरातील मुख्य रस्ते आणि चौक असणारा बशीरगंज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, धोंडीपुरा, शाहूनगर, मोमीनपुरा, पालवन रोड सह अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे बशीर गंज चौक परिसरात तळ्याचे स्वरूप आल्याने अनेक वाहने बंद पडली होती. तर भरपावसात अनेकांना वाहने सुरू होत नसल्याने दे धक्का द्यावा लागला. यामुळे बीडकरांची चांगलीच दैना उडाली होती.

दरम्यान तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा ग्रामीण भागात अनेक नद्यांना पूर परस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीतून वाचलेल्या पीकाचे पुन्हा या मुसळधार पावसाने नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT