Rain Update: जालन्यात अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान  Saam Tv news
महाराष्ट्र

Rain Update: जालन्यात अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान

जिल्ह्यात आज तिर्थपुरी मंडळात सर्वात जास्त 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना: हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने (Monsoon) मुसळधार हजेरी लावली. जिल्ह्यात आज तिर्थपुरी मंडळात सर्वात जास्त 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या मुसळधार पावसाचा मोठा फटका उभ्या पिकांना (Farms) बसल्याचे दिसत आहे.

हे देखील पहा-

आज सकाळी नऊच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यात व जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढग फुटीदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अंबड आणि जालना तालुक्यातील गोलापांगरी परिसरातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला आहे. तिर्थपुरी मंडळात 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुरामुळे दुधना नदी पात्रावर असलेला कोल्हापुरी बंधारा खळखळून वाहू लागला आहे. या पुराचे पाणी नदी काठच्या अनेक शेतात शिरल्याने कापूस, तूर, मूग, सोयाबीन, ऊस, मोसंबी या पिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणी जमीन खरडुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने जरी उघडीप दिली असली तरी मठपिंपळगाव शिवारातील पार नदी ओसंडून वाहू लागली आहे.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT