Gadchiroli Flood, gadchiroli nagpur highway, gadchiroli charmoshi highway saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Floods : गडचिरोलीत मुसळधार, वैनगंगाला पूर; नागपूर, चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस बंद

सध्या धानपिक जोमात असताना धरणाच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. बहुतांश ठिकाणी धरणातून शेतीला पाणी साेडा अशी मागणी हाेत आहे. दूसरीकडे विदर्भातील गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Maharashtra News)

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे (rain) धरणाचे (Gose Khurd Dam) सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. या ठिकाणाहून 60 हजार हुन अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पूर (wainganga river flooded) आला आहे.

परिणामी गडचिरोली-नागपूर (gadchiroli nagpur highway) आणि गडचिरोली-चामोर्शी (gadchiroli charmoshi highway) हे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आज (शनिवार) सकाळी बंद झाले आहेत. आताही गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती झाली आहे. सध्या धानपिक जोमात असताना धरणाच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar Childhood Photos: कुरळ्या केसांचा हिरो! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपणीचे हे फोटो पाहिलेत का?

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT