Maharashtra Rain Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात यंदा पाऊस चारही महिने बरसणार; ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदाचा पावसाळा मागील दोन वर्षासारखाच पाणीदार असणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदाचा पावसाळा मागील दोन वर्षासारखाच पाणीदार असणार आहे. कारण पावसाळ्यातले चारही महिने चांगल्या पावसाचे असतील असा अंदाज आस्ट्रेलियन हवामान खात्यानं वर्तविला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातले चारही महिने पाऊस धोधो बरसणार आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. जूनच्या सुरुवातीपासूनचं यंदा पाऊस असणार आहे. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही सामान्यांपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यापुढच्या काळात मागच्या वर्षासारखी अतिवृष्टीची शक्यता आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यापूर्वी मात्र, सलग ८ वर्ष मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यावर्षीच्या अंदाजात मात्र, दुष्काळासारखी भयावह स्थिती निर्माण होणार नाही. आता ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या अंदाजापाठोपाठ भारतीय हवामान खात्याकडून अंदाज येणार आहे. आता सध्याच्या अंदाजानुसार ९८ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज आहे.

पाऊस चांगला झाला की पाण्याचा प्रश्न मिटतो. शेती उत्पादनात वाढ होते, अर्थव्यवस्थेला गती मिळते. त्यामुळे यंदाचा पावसाळा चांगल्या पावसाचे शुभसंकेत घेऊन येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT