Monsoon 2023 SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात आज कसा असेल पाऊस?; ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Rain Forecast in state : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

Rain News Update : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने काल अक्षरश: धुवून काढलं. काल राज्यातील सात जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, ठाण्यात पावसाची दिवसभर जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. आज पावसाचा (Heavy Rain)  मूड कसा असेल यावर एक नजर टाकूया.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. ठाण्यासह ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest News)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील पाऊस

काल मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली भागात मागील 12 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दहिसर परिसरात 100-170 मिमी आणि कल्याणजवळील भागात 140 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईतही 60-100 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

ठाणे जिल्हात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या पहिली ते बारावीच्या विदयार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हातील सर्व शाळांना 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 105 गावांमध्ये गारपीट

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT