Railway, Solapur, Train Saam Tv
महाराष्ट्र

Railway Update : चार दिवसांचा मेगा ब्लॉक, जाणून घ्या काेणत्या एक्स्प्रेस झाल्या रद्द, रेल्वेचा मार्गही बदलला

सोलापूर विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवास यांची गैरसोय होणार आहेत. 

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर रेल्वे (solapur railway) विभागात चार दिवसाचा ट्राफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर अनेक एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर विभागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची (rail passengers) गैरसोय होणार आहे. (Breaking Marathi News)

सोलापूर विभागातील बेलापुर, चितळी आणि पुंतांबा स्टेशन,  दौंड- मानमाड सेक्शन दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण NI ब्लॉक काम सुरू आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. चार दिवस ट्राफिक ब्लॉक चालू असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. आजपासून (ता. 25 मार्च) 30 मार्चपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांची वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

दौंड निजामाबाद एक्सप्रेस, निजामाबाद पुणे एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, हडपसर नांदेड एक्सप्रेस, कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस, नागपूर पुणे या गाड्या रद्द करण्यात आले आहे. याची प्रवाशांनी नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

दरम्यान बेंगलोर न्यू दिल्ली सुपरफास्ट, एक्सप्रेस हावडा पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे वाराणसी एक्सप्रेस, यशवंतपुर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. तर इतर रेल्वे (एक्सप्रेसच्या) गाड्या हा परावर्तित करण्यात आल्यात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT