Youth Killed After Slipping Into Deep Valley Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: धबधब्यावर रिल्स बनवताना पाय घसरला, खोल दरीत पडून ठाण्याच्या तरुणाचा मृत्यू

Youth Killed After Slipping Into Deep Valley: रायगडमध्ये धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. पाय घसरून हा तरुण दरीत पडला.

Priya More
  • खोपोलीतील धबधब्यावर रिल्स बनवताना तरुणाचा मृत्यू

  • धबधब्यावर पाय घसरून दरीत पडला

  • पावसाळी पर्यटनासाठी मित्रांसोबत गेला होता

  • रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला

सचिन कदम, रायगड

ठाण्यातील तरुणीचा खोपोलीमध्ये खोल दरीत पडून मृत्यू झाला. या तरुणाचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायगडच्या खोपोलीमधील एका धबधब्यावर घडली. रविवार असल्याने हा तरुण आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला. रिल्स बनवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावरील रिलसाठी फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या नादात ठाण्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायगडच्या खोपोलीतील धबधब्यावर पाय घसरून हा तरुण खोल दरीत कोसळला. अभिषेक कुशवाह (वय २३ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव होते. अभिषेक आपल्या ३ मित्रांसोबत रविवारी सुट्टी असल्यामुळे रायगडच्या खोपोलीतील केपी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी गेला होता.

फोटो व्हिडीओ काढल्यानंतर तो धबधब्यावरून परत निघत असताना त्याचा पाय घसरला आणि तो ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला. अभिषेक दरीत कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ मदतीसाठी इतरांची मदत मागितली. खोपोलीतील हेल्प फाऊंडेशन या बचाव पथकाने शोध कार्य राबवले. पण तोपर्यंत उशिरा झाला होता. अखेर मध्यरात्री अभिषेकचा मृतदेह सापडला.

धोकादायक ठिकाणी, पावसाळी पर्यटनस्थळी सेल्फी आणि रिल्सचा मोह जीवघेणा ठरू शकतो याच आणखी एक उदाहरण रायगडमध्ये या दुर्घटनेमुळे समोर आले आहे. पोलिसांनी पर्यटनस्थळी जाणाऱ्या तरुण-तरुणींना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अभिषेकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Cream: तांदळाच्या पाण्यापासून घरीच तयार करा 'ही' नाईट क्रीम; सकाळी मिळेल नॅचरल गुलाबी चमक

Relationship Tips : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

SCROLL FOR NEXT