31st December : पर्यटकांनी घेतला कोरोना निर्बंधांचा धसका!  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

31st December : पर्यटकांनी घेतला कोरोना निर्बंधांचा धसका!

अलिबागसह नागाव, काशीद , किहीम मुरुड भागात पर्यटकांनी हॉटेल्स, रिसॉर्ट आणि लॉजेसचं बुकिंग रद्द केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : राज्य सरकारने घातलेल्या कोरोना निर्बंधाचा पर्यटकांनी चांगलाच धसका घेतलाय. त्यामुळे जिल्ह्यात थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत रोडावली आहे. त्याचा परिणाम रायगडमधील पर्यटन व्यवसायावर होताना दिसतो आहे. अलिबागसह (Alibag) नागाव, काशीद , किहीम मुरुड भागात पर्यटकांनी केलेले हॉटेल्स, रिसॉर्ट आणि लॉजेसचं बुकिंग रद्द केलं आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत असून त्यांच्यात नाराजीचा सूर  आहे.

हे देखील पहा :

कोरोना (Corona) प्रादुर्भाव कमी झाला असल्याने अनेकांनी 2022 सालाचे धुमधडाक्यात स्वागत रायगडात (Raigad) जाऊन करायचे असा बेत पर्यटकांनी आखला होता. पर्यटकांनी महिनाभर आधीच हॉटेल, कॉटेज, लॉज, रिसॉर्टची आगावू बुकिंग केली होती. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने आणि त्यातच ओमीक्रोन हा नवा विषाणूही आला असल्याने राज्य शासनाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला कडक निर्बंध लागू केले.

मात्र, याचा आर्थिक फटका हा जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना बसला असून आगावू केलेल्या बुकिंग पर्यटकांनी कोरोनाच्या नव्या निर्बंधांमुळे रद्द केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी नववर्षाच्या अनुषंगाने गजबजून जाणारे समुद्रकिनारे काही प्रमाणात सुनेसुने वाटत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटली? राज्यसभेवरून घडी विस्कटली, मविआतील विसंवादाचं कारण आहे काय?

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

War Fears : इराण सोडा! भारतीयांना मोदी सरकारने का दिले आदेश? नेमकं काय आहे प्रकरण?

गतविजेत्या भारताचा दारूण पराभव; सेमीफायनलचं गणित बिघडलं, टी२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडणार?

महाराष्ट्रातील गर्भाशयातील बिजांड विक्रीच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश? धागेदोरे थेट बंगळुरू-तेलंगणात

SCROLL FOR NEXT