Nitin Chandrakant Desai's Funeral Saam TV
महाराष्ट्र

Nitin Desai Death: नितीन देसाई मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; फायनान्स कंपनीसह एडलवाइजच्या व्यवस्थापकीय संचालकांना रायगड पोलिसांची नोटीस

रायगड पोलिसांनी फायनान्स कंपनीसह एडलवाइजच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस पाठवली आहे.

Vishal Gangurde

Nitin Desai News: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल  फायनान्स कंपनी आणि एडलवाइजच्या ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता रायगड पोलिसांनी ईसीएल फायनान्स कंपनीसह एडलवाइजच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस पाठवली आहे. रायगड पोलिसांनी नोटीस पाठवून वेगवेगळ्या मुद्यांवर माहिती मागविली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाइज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना रायगड पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. रायगड पोलिसांनी या ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून वेगवेगळ्या मुद्यांवर माहिती मागविली आहे. तसेच रायगड पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या कंपनीच्या 5 संचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे .

नितीन देसाई प्रकरणात आतापर्यंत ११ जणांचे जबाब नोंदवले आहे. नितीन देसाई मृत्यू प्रकरणाचा तपास 1 डी वाय एस पी, 1 पोलीस निरीक्षक, 3 सहायक पोलिस निरीक्षक आणि 4 कर्मचारी यांची टीम करत आहे. तसेच पोलीस हे एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार आणि अकाउंटंट यांच्याकडून माहिती घेत आहेत.

नितीन देसाई प्रकरणात पाच जणांवर गुन्हा

नितीन देसाई मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एडलवाइज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित चार जणांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये एडलवाइज कंपनीचे स्मित शहा, केऊर मेहता, आर के बन्सल आणि कोर्टाने दोनही पार्टीमध्ये चर्चा करून कर्जाचा विषय सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या जितेंद्र कोठारी यांच्या नावाचाही सामावेश आहे. दरम्यान, रायगड पोलिसांनी या ग्रुपच्या व्यवस्थापक संचालकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

एडलवाइज कंपनीने काय स्पष्टीकरण दिलं होतं?

नितीन देसाई मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर एडलवाइज कंपनीने सगळ्या बाजूंची सखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करणार, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT