Kalyan Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Raigad Crime News: रायगड पोलिसांची मोठी कारवाई; 218 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Raigad Crime News In Marathi: रायगड पोलिसांनी खोपोलीत मोठी कारवाई केली आहे. रायगड पोलिसांनी खोपोलीत पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 218 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं आहे.

Vishal Gangurde

Raigad Crime News In Marathi:

रायगड पोलिसांनी खोपोलीत मोठी कारवाई केली आहे. रायगड पोलिसांनी खोपोलीत पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी खोपोलीतून 174.5 किलो वजनाचे 218 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं आहे. या आधी 8 डिसेंबर रोजी 85 किलो 200 ग्रॅम माफेड्रोन जप्त करण्यात आलंय. (Latest Marathi News)

खोपोलीतील (Khopoli) ढेकू गावच्या हद्दीत कंपनीवर पहिली कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर होनाड गावातील एका गोडाऊनवर दुसरी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पुन्हा एकदा मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे.

केवळ चार दिवसात दोन कारवाया करत रायगड पोलिसांनी तब्बल 325 कोटी 42 लाख रुपयांचे मॅफेड्रॉन नावचे अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दिली आहे.

जालन्यात गजानन तौर यांची गोळ्या झाडून हत्या...

विविध राजकीय आणि प्लॉटिंग व्यवसाय तसेच गोळीबार प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गजानन तौर या तरुणाची भरचौकात गोळ्यात घालून हत्या करण्यात आली आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गजानन तौर याने जालना शहरात कालपासून अर्जुन चषक ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. याचं स्पर्धेच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तौर हा जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही सहकार्‍यांसह उभा होता. याच वेळी मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी तौर याच्यावर पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT