Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News : निवडणुकीच्या दिवशी बिरवाडीमध्ये भानामतीचा प्रकार; चौकात तीन मडके व नारळ रचले

Raigad News : बिरवाडी शहरातील नाक्यावर कोणीतरी तीन मडके व नारळ रचून भानामती केल्याचा प्रकार निदर्शनास पडला आहे

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. याच निवडणुकीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बिरवाडीमध्ये भानामती केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिरवाडी शहराच्या नाक्यावर तीन मडकी आणि नारळ रचुन ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरवात झाली आहे. यामुळे मतदान केंद्रांवर प्रशासकीय यंत्रणेची अगदी पहाटेपासूनच वर्दळ सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर उमेदवारांचे कार्यकर्ते देखील फिरत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याच दरम्यान रायगड (Raigad) जिल्ह्यातील बिरवाडी शहरातील नाक्यावर कोणीतरी तीन मडके व नारळ रचून भानामती केल्याचा प्रकार निदर्शनास पडला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.  

नाक्यावर लाल आणि काळ्या फडक्याने कापडाची तोंड बंद करून खाली नारळ ठेवण्यात आला आहे. बिरवाडी आसनपोई रस्त्यावरील नाक्यावर अगदी मधोमध हा उतारा ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भिती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT