Sunil Tatkare Saam tv
महाराष्ट्र

Sunil Tatkare News : जरांगे पाटलांना आंदोलन करण्याचा अधिकार, पण शासन, मुख्यमंत्री याच्याविषयी संयमाने बोलाव; खासदार सुनील तटकरे

Raigad News : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले आहे.

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: मराठा आरक्षणाची मागणी शासनाने मेनी केली आहे. काही त्रुटी असल्यास त्या देखील दूर केल्या जातील. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन करावे मात्र शासन, मंत्री व मुख्यमंत्री याच्याविषयी संयमाने बोलाव; असा सल्ला (Raigad) रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिला आहे.  (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले आहे. महायुती सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देत अनेक वर्षांची मराठा समाजाची मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटील यांनी ज्या कारणासाठी आंदोलन केल, ती मागणी विषेश अधिवेशन घेऊन पूर्ण झाली आहे. अजुनही काही त्रुटी असतील तर ते सरकारसोबत चर्चा करू शकतात. त्यांनी सरकारकडे चर्चेतुन मार्ग काढावा आणि कुठल्याही स्वरूपाचा तणाव निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करावे अशी विनंती खासदार तटकरे यांनी जरांगे पाटील यांना केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसीतुन आरक्षणाची मागणी मराठा समाजाची कधीच नव्हती
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण मिळाव, ही मागणी सकल मराठा समाजाची कधीच नव्हती; असा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी लोकशाही आघाडी सरकार आणि आत्ताच्या सरकारच्या काळात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची आठवण करून दिली. सरकार आणि मराठा समाज संघटना यांची सुरुवातीपासून स्वतंत्रपणाच आरक्षण मिळाव अशी मागणी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT