मेंदूवडा 
महाराष्ट्र

आता राख्‍यांमध्‍येही मेदूवडा, ढोकळा, मसाला डोसा अन्‌ पिझ्झा

आता राख्‍यांमध्‍येही मेंदूवडा, ढोकळा, मसाला डोसा अन्‌ पिझ्झा

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : भाऊ बहिणीच्‍या नात्‍याची वीण घट्ट करणारा सण येत्‍या रविवारी साजरा होत आहे. यानिमित्‍ताने बाजारात विविध प्रकारातील राख्‍या विक्रीसाठी दाखल आहेत. प्रामुख्‍याने लहान मुलांसाठी विविध डिझाईनमध्‍ये राख्‍या असताना आता मेंदूवडा, पिझ्झा, ढोकळा यासारख्‍या राख्‍या देखील आकर्षित करत आहेत. (raigad-news-rakhshabandhan-also-include-menduvada-dhokla-masaladosa-pizza-types-rakhi)

भाऊ बहिणीचा प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. संकटकाळात आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या भावाला राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी बाजारात बहिणीची गर्दी दुकानात दिसू लागली आहे. येत्‍या रविवारी (२२ ऑगस्ट) राखीपौर्णिमा सण साजरा होत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील बाजरपेठा विविधरंगी राख्यांनी सजल्या आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बाजरपेठेत राखी दुकानात खरेदीसाठी बहिणीची लगबग सुरू झाली आहे.

दुकाने सजली

रविवारी (ता.२२) राखीपौर्णिमा आहे. दिवाळीत भाऊबीज तर श्रावणात राखीपौर्णिमा हा सण बहिणीचा हक्काचे दिवस मानले जातात. आपल्या भाऊरायला ओवाळणी करून त्याच्या हाताला आकर्षक राखी बांधून माझ्या पाठी ठामपणे उभा रहा; असा आशीर्वाद भावाकडून बहीण घेत असते. राखी पोर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठेतील दुकाने राख्यांनी सजली आहेत.

कार्टुनसोबत खाद्यपदार्थांच्‍याही राखी

लहान मुलांसाठी आकर्षित करणाऱ्या कार्टून पात्रासोबत मेंदूवडा, पिझ्झा, ढोकळा, मसाला डोसा यासारख्या वेगळ्या राख्याही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या राख्यानाही चांगली मागणी आहे. कोरोनाचे संकट असले तरी बहीण भावाचा हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी बहिणी सज्ज झाल्या आहेत.

संपादन– राजेश सोनवणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT