Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: फेसबुकवर झाला विदेशी मित्र; मित्राचे सरप्राईज गिफ्ट पडले महागात, सव्वा कोटीचा गंडा

फेसबुकवर झाला विदेशी मित्र; मित्राचे सरप्राईज गिफ्ट पडले महागात, सव्वा कोटीचा गंडा

साम टिव्ही ब्युरो

रायगड : सध्‍या ऑनलाईनचा जमाना आहे. घरातील छोट्या मोठ्या वस्तु विकत घेण्यापासुन, तर मैत्री देखील ऑनलाईन केली जात आहे. या ऑनलाईन मैत्रीमुळे रायगड (Raigad News) जिल्ह्यातील अलिबाग येथील महिलेला तब्बल एक कोटी बारा लाख रुपयांचा गंडा घातला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत अलिबाग (Alibag) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असुन पोलिस तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

सदर महिला ही अलिबाग येथील रायगड जिल्हा सत्र न्यायालयातील निवृत उच्चपदस्त अधिकारी आहे. तिने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार एका परदेशी नागरीकाशी फेसबुकवरून मैत्री झाली. तिच्या या फेसबुक मित्राने तिला सरप्राइज गिफ्टचे अमिष दाखवले. या सरप्राईज गिफ्टच्या अमिषात अडकलेल्या महिलेने या परदेशी मित्राने केलेल्या मागणीनुसार दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता गिफ्ट टॅक्स, गिफ्टमध्ये असलेली करन्सी (Cyber Crime) एक्सचेंज टॅक्स, कस्टम चार्जेस असे मिळून जवळजवळ एक कोटी बारा लाख रुपये एवढी मोठी रक्कमे ऑनलाईन पाठवुन दिली.

सरप्राइज गिफ्ट आलेच नाही

विषेश म्हणजे अनोळखी व्यक्तीला आपण येवढी मोठी रक्कम देतो; याबद्दल महिलेला संशय देखील आला नाही. मागणी केलेली रक्कम देऊन सुद्धा सरप्राइज गिफ्ट काही पोहचले नाही. त्यानंतर फसवणुक झाल्याचे समोर येताच पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली. घडला प्रकार सांगित तक्रार दाखल केली. त्‍यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT