Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: मुंबई– पुणे एक्स्प्रेसवेवर बस, ट्रकचा अपघात; चार जण जखमी

मुंबई– पुणे एक्स्प्रेसवेवर बस, ट्रकचा अपघात; चार जण जखमी

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : मुंबई– पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

मुंबई– पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळील बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ मुंबई लेनवर हा अपघात झाला. आज पहाटेच्‍या सुमारास घाटातून जात असलेल्‍या बसला मागून येत असलेल्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे जोरदार आवाज झाला. यामुळे बसमधील प्रवाशी घाबरले होते. पहाटेची वेळ असल्‍याने बसमधील अनेक प्रवाशी झोपलेले होते.

मागील प्रवाशी जखमी

ट्रकने मागून धडक दिल्‍याने बसमध्‍ये मागच्‍या बाजूला बसलेले चार प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाल आहे. अपघात झाल्‍यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस मदत करीत आहेत. अपघाताचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Dish Recipe : मुलं नेहमी गोड खाण्याचा हट्ट करतात? मग फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

SCROLL FOR NEXT