Mandle Waterfall Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: मित्रांसोबत पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, मांडले धबधब्यात बुडून २ तरुणांचा मृत्यू

Mandle Waterfall: मांडले धबधब्यामध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन्ही तरुणांचा मृतदेह सापडले असून त्यांची ओळख देखील पटली आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

Mahad News: मित्रांसोबत पिकनिकला (Picnic) जाणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना रायगडमध्ये (Raigad) घडली आहे. मांडले धबधब्यामध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन्ही तरुणांचा मृतदेह सापडले असून त्यांची ओळख देखील पटली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील मांडले गावातील धबधब्यामध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सचिन औकिरकर आणि रोहित औकिरकर अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीतील रहिवासी आहेत.

सचिन आणि रोहित हे दोन्ही तरुण आपल्या मित्रांसोबत मांडले धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. याच वेळी धबधब्याखाली मित्रांसोबत मजामस्ती करत असताना हे दोन्ही तरुण पाण्यामध्ये बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी आणि बचाव पथाकने घटनास्थळी धाव घेतली.

बऱ्याच वेळ शोध घेतल्यानंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहेत. या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणाची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT