raigad news Saam Tv
महाराष्ट्र

महाड तालुक्यातील बावळे गावावर दरडीचे सावट; डोंगराला मोठमोठ्या भेगा

प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रायगड: महाड तालुक्यातील किल्ले रायगड (Raigad) परिसरात असलेल्या बावळे गावाला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. बावळे गावच्यावरील भागात आसलेल्या डोंगर माथ्यावर मोठमोठ्या भेगा गेल्या असून, यामुळे गावावर दरड कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे.  डोंगर भागात गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली आहे.  डोंगर माथ्यावरील जमीन भेगाळल्याने ग्रामस्थांमध्ये दरडीची भिती निर्माण झाली आहे.

या घटनेची माहिती प्रशासनाला दिली आहे. सुरक्षेबाबातच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या असून ग्रामस्थ सुरक्षित आहेत.  प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. अशी माहिती प्रांताधिकारी यांनी दिली आहे.

मागील वर्षी वरंध घाटात कोसळलेले दरडीची माती आणि मोठमोठे दगड घाट रस्त्यात कायम असल्याने प्रवाशी आणि वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रायगड (Raigad) आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट हा रायगड जिल्ह्यासाठी व्यापारी दृष्ट्या अतीशय महत्वाचा आणि जवळचा रस्ता आहे.  या घाट रस्त्यावर गेली अनेक वर्ष दरड कोसळून पावसाळ्याचे तीन ते चार महिने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो आहे.  पावसाळ्यात कोसळलेल्या दरडीची माती आणि मोठमोठे दगड काढण्यासाठी तसेच रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र आजही या घाट रस्त्याच्या बाजुला मोठमोठे दगड, माती आणि रस्त्यात खड्डे आहेत.  यामुळे येथून प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक यांच्या जीवीतास धोका निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 हजार देतो, तुझ्या मुलीला पाठव… लॉकअपमधील आरोपी महिलेकडे पोलीसाची घाणेरडी मागणी; ASI थेट तुरुंगात

South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा पहिला बळी, अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; ३ तासांपासून पावसाचा कहर सुरू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : धुळे शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पटेल-तटकरेंची अनुपस्थिती? पडद्यामागे काय घडतंय?

SCROLL FOR NEXT