रायगडात मृत्यूचं तांडव! तळीयेत 38 तर पोलादपूरात 9 मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

रायगडात मृत्यूचं तांडव! तळीयेत 38 तर पोलादपूरात 9 मृत्यू

ढगफुटी सारख्या पावसामुळे Rain डोंगराच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या तळीये taliye गावावर मोठी दरड कोसळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळली Collapse आहे. ढगफुटी सारख्या पावसामुळे Rain डोंगराच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या तळीये taliye गावावर मोठी दरड कोसळली आहे. दरड कोसळून यामध्ये जवळपास ७२ जण गाडले गेल्याची माहिती समोर आली होती. तर या गावामध्ये ४०० ते ५०० लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता नविन मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढून ३८ वरती गेला आहे. अजून 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पोलादपुर तालुक्यात दरड कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गंभीर बाब म्हणजे गावामध्ये पोहोचण्याची सुद्धा काही सोय नाही. काल संध्याकाळी घडलेल्या या घटनेमध्ये अनेकांच्या मृत्यूची भीती देखील व्यक्त केली जात होती. तर संपूर्ण गावालाच पाण्याचा वेढा असल्यामुळे गावापर्यंत मदत पोहचवणं जिकीरीचं होते. काल संध्याकाळपर्यंत एनडीआरएफ तसेच कोस्ट गार्ड हे पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रत्यक्ष गावात बचावकार्याला वेळ लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली होती. रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकलेली नव्हती.

पूरस्थितीमुळे गावातील सर्व रस्ते बंद असल्याने एनडीआरएफची टीमही तेथे पोहोचू शकलेली नव्हती. महाड, पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तळीये गावात सध्या एमडीआरएफचे २० ते २५ जवान रवाना झाले आहेत. बचावकार्य सुरु आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT