Raigad: गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; घरोघरी गणरायाचे आगमन
Raigad: गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; घरोघरी गणरायाचे आगमन राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad: गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; घरोघरी गणरायाचे आगमन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - रायगड Raigad जिल्ह्यातही गणेशोत्सवाचा Ganeshotsav उत्साह दिसून येत आहे. सकाळीच घरोघरी गणरायाचे आगमन झाले. गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी चित्रशाळांमध्ये लहान थोर भाविकांनी गर्दी केली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाची मूर्ती घरी आणण्यात येते.

हे देखील पहा-

गणेशमूर्तीची प्रतिष्टापना करून तिची शोडशोपचारे पूजा अर्चा करण्यात येते. कोरोनाचे निर्बंध पाळत जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. लहान मोठ्यामध्ये उत्साहाचे वातावरण रायगड मध्ये दिसून येत आहे.

सलग दुसऱ्या वर्षीच्या कोरोनाच्या Corona Wave सावटात देखील  बाप्पाच्या पाहुणचारात काही कमी राहायला नको, यासाठी घरोघरी स्वागताच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. रायगडात या वर्षी सार्वजनिक व घरगुती 1 लाख 285 तर सार्वजनिक 285 गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या वर्षी अगदी साधेपणात गणेशोत्सव साजरा होत असला तरी गणेशभक्तांचा आनंद मात्र तसूभरही कमी झालेला नाही.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT