Bharat Gogawale Aghori Puja saam tv
महाराष्ट्र

Bharat Gogawale Aghori Puja: ही अघोरी....; मंत्री गोगावलेंच्या व्हायरल व्हिडिओवर अंनिसची प्रतिक्रिया

Bharat Gogawale Aghori Puja: शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते पूजा करताना दिसत आहेत. त्यावर अंनिसनं प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भरत गोगावले घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. मंत्रीपदासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. तर संभाजी ब्रिगेडनेही गोगावले यांच्यावर टीकेची तोफ डागलवी आहे. गोगावले यांच्या व्हायरल व्हिडिओवर आता अंनिसने प्रतिक्रिया दिलीय.

...पण धार्मिक कर्मकांड

अंधश्रद्धा निर्मुलन करणारी संघटना अंनिसने हा अघोरीपणा वाटत नसल्याचं म्हटलंय. हा अघोरीपणा नाही मात्र धार्मिक कर्मकांड असल्याचा आरोप केलाय. भरत गोगावले यांनी केलेल्या पूजेमध्ये मध्ये अघोरीपणा वाटत नाही. एखाद्या माणसावर जादूटोणा करतोय, असा आरोप करणं हाही एक कायद्याने गुन्हा आहे.

अघोरी प्रकारात बळी दिला जातो किंवा इतर काही अघोरी असतं. मात्र मंत्री भरत गोगावले यांनी केलेली पूजा अघोरी नाही. जो भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात अघोरी सारखा काही प्रकार दिसत नाहीये. पण हा धार्मिक कर्मकांड असल्याचा आरोप अंनिसकडून करण्यात आलाय.

तटकरे पिता-पुत्राकडून अघोरी पुजा

मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या पुजेचे व्हिडीओ व्हायरल करून अघोरी पुजेचे आरोप राष्ट्रवादीकडून केले जात असताना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खा. सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे बुवांसोबत पुजा आणि नमस्कार करत असलेले फोटो पत्रकारांना दिले आहेत. तटकरेंशी या फोटो वर डिबेट करायला आम्ही तयार असून मंत्री भरत गोगावले यांचे आपण समर्थ करणार असल्याचे दळवी म्हणाले आहेत.

अघोरी पूजेच्या आरोपावर काय म्हणाले गोगावले?

राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेचा आरोप केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. मंत्री गोगावले यांनीही सुनिल तटकरे आणि सूरज चव्हाण यांना सणसणीत उत्तर दिलंय. अघोरी,बिघोरी आम्ही जाणत नाही. साधू- संत भेटीसाठी येतात त्यांची आम्ही भेट घेत असतो. अघोरी काय करायचं असतं. जर ते करायचे असते तर ते आधीच केलं असतं आणि पालकमंत्री झालो असतो. असं गोगावले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : प्रज्ञा सातवांसह २ आमदार भाजपात प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT