Raigad Crime Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime : अनैतिक संबंधातून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या, महिलेने जेवणात विष कालवून संपवलं

Raigad News : रायगडच्या श्रीवर्धन येथे वास्तव्यास असलेले रामदास खैरे यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केल्यानंतर प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याची माहिती समोर आली

Rajesh Sonwane

सचिन कदम 

रायगड : दोन दिवसांपूर्वी रायगडच्या श्रीवर्धन येथे निवृत्त बँक कर्मचारी रामदास खैरे यांचा मृतदेह सापडला होता. या मृत्यूच्या कारणांचा उलगडा करत पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात एका महिलेने खैरे याना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी पतीच्या मदतीने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

रायगडच्या (Raigad News) श्रीवर्धन येथे वास्तव्यास असलेले रामदास खैरे यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केल्यानंतर प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी (Police) याबाबत सखोल चौकशी केली असता अनैतिक संबधातुन रामदास खैरे यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 

महिलेने प्रेम संबंधाचा केला बनाव 

रामदास खैरे यांच्याशी एका महिलेने प्रेम संबधांचा बनाव केला. संशयित आरोपी महिलेने रामदास खैरे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्‍नाचे आमिष दाखविले. (Crime News) इतकेच नाही तर त्‍यांच्याकडून दागिने आणि रोख रक्‍कम घेतली होती. दरम्यान खैरे यांनी सदर महिलेजवळ दिलेले दागिने आणि पैसे परत मागितले. मात्र महिलेकडून देण्यास टाळाटाळ केली जात होती. यामुळे सदर महिलेने खैरे याना संपविण्याचा कट रचला होता. 

जेवणात कीटकनाशक मिळवून केले ठार 

दागिने आणि पैशांसाठी तगादा लावला असता सदर महिलेने आपल्‍या पतीला सोबत घेवून खैरे यांना जेवणातून कीटकनाशक दिले. खैरे बेशुद्ध झाल्‍यानंतर त्यांना ठार मारून हे दोघेही फरार झाले. मात्र महिलेला तीच्या पतीसह रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अटक केली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT