Raigad Crime x
महाराष्ट्र

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Raigad Crime : रायगडमध्ये सोन्याच्या दागिन्यांसाठी दोन अल्पवयीन मुलांनी ८० वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

  • दागिन्यांसाठी ८० वर्षीय महिलेची हत्या करुन मृत्यूचा बनाव रचला.

  • अल्पवयीन तरुणांनी गळा दाबून महिलेला संपवलं.

  • या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad News : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रायगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या केली आहे. महिलेच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी त्यांनी महिलेचा गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिश रिपेअरिंगसाठी घरी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी वृद्ध महिलेची हत्या केली. महिलेच्या अंगावरील दागिने लपास करुन ते दोघे पसार झाले. मृत्यू नैसर्गिक वाटावा यासाठी त्यांनी महिलेला झोपवून आरोपी पळून गेले. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडल्याचे म्हटले जात आहे.

शेवंता भावे (वय ८० वर्षे) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी ती घरात मृत अवस्थेत आढळली. तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला. तेव्हा अंत्यसंस्कारादरम्यान महिलेच्या अंगावर दागिने नसल्याबाबत चर्चा सुरु झाली. अंत्यसंस्कारानंतर वृद्धेच्या नातलगांनी पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी वृद्ध महिलेच्या दागिन्यांचा तपास केला. त्यावेळेस घडलेल्या प्रकाराच खुलासा झाला. पोलिसांनी मुद्देमालासह दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम १०३, ३११, ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मुलांना कर्जत येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Mango Pickle Recipe: कैरीच्या लोणच्याचे ५ चविष्ट प्रकार

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

SCROLL FOR NEXT