महाराष्ट्र

Raigad Accident: रायगडहून ऐरोलीला जाणाऱ्या बसचा अपघात; ५० फुट खोल दरीत कोसळली प्रवाशांनी भरलेली बस

Raigad Accident: रायगडहून ऐरोली येणाऱ्या एका प्रवाशी बसचा अपघात झालाय. बस ५० फुट खोल दरीत कोसळलीय.

Bharat Jadhav

सचिन कदम, साम प्रतिनिधी

रायगडहून ऐरोलीला येणाऱ्या बसचा मोठा अपघात झाल्याची घडलीय. बस ५० फूट खोल दरीत कोसळलीय. पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात हा अपघात झालाय. घाटात वळण घेत असताना चालकाच बसवरील नियंत्रण सुटलंय. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.

आणखी एक अपघाताची घटना

माणगाव येथे एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. माणगावच्या कचेरी रोडवरील आपला बाजार समोर हा अपघात झाला. या अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. आपला बाजार येथे खरेदीसाठी आलेले महिला आणि पुरुष दुचाकीवर बसले होते. ते खरेदी करून जाणार होते, त्याचवेळी मागून भरधावपणे आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. कार चालक अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती समोर आलीय.

अशाच एका अपघातीची घटना नांदेडमध्ये घडलीय. एका कारने अनेकजणांना उडवल्याची घटना घडलीय. यात काहीजण जखमी झाले आहेत. शहरातील देगलूर नाका येथे एका कार चालकाने सुसाट कार चालवत अनेक गाड्यांना उडवलं. कारचा टायर फुटल्यानंतरही कार चालकाने तब्बल एक किलोमीटर कार पळवल्याची माहिती आहे. त्यानंतर ही गाडी काही नागरिकांनी शहरातील नमस्कार चौकात अडवली. विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त कार ताब्यात घेतली आहे. आरोपीला मेडिकलसाठी पाठवण्यात आले आहे. चालक दारूच्या नशेत असल्याचेही माहिती मिळत आहे. आता या गाडीने किती जणांना उडवले याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नव कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Maharashtra Live News Update: दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT