Nagpur: बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; लाखोंचा माल जप्त Saam TV
महाराष्ट्र

Nagpur: बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; लाखोंचा माल जप्त

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत चनकापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये खापरखेडा डीबी शाखेच्या पथकाने बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला

साम टिव्ही ब्युरो

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत चनकापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये खापरखेडा डीबी शाखेच्या पथकाने बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आणि पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाशिवाय देशी आणि विदेशी दारू बनवण्यासाठी 2 मशीन , 5 ट्रे डुप्लिकेट देशी दारू, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्यांच्या 15 पोती, 50 लिटरचे 8 डबे, 50 लिटर दारू, देशी आणि विदेशी दारूचे लेबल, 8 बोरोमध्ये दारूच्या पेट्या, 2 बाईक, 2 चारचाकी वाहन , एकूण 17 लाख रुपयांचा माल जप्त केलेला आहे. आणि घटनास्थळावरून आरोपी विशाल शंभू मंडल, मिथुन शहा या दोघांना अटक करण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून बनावट दारू बनवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहे.

दरम्यान नागपूरला गुन्हा काही नवीन नाही. 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार गर्भापात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT